अमळनेर बसस्थानक शेजारील अतिक्रमण १० रोजी हटवणार – ५० जणांना नोटिसा

0
New-Doc-03-08-2025-09.21.jpg

आबिद शेख /अमळनेर

अमळनेर – शहरातील बसस्थानक शेजारील गांधीनगर भागातील ५० अतिक्रमणधारकांना पालिकेने नोटिसा बजावल्या असून, १० मार्च रोजी सोमवारी अतिक्रमण हटवले जाणार आहे.

गांधीनगर परिसरात अनेकांनी रस्त्यावर घरे व दुकाने उभारली होती, ज्यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच, शेजारीच प्रशासकीय व महसूल इमारतीचे काम सुरू असल्याने पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.

पालिकेने या रहिवाश्यांसाठी टाकरखेडा रस्त्यावर म्हाडाची घरे उपलब्ध करून दिली होती, मात्र तरीही त्यांनी जागा खाली केलेली नाही. काहींनी आपली घरे भाड्याने देऊन व्यवसाय सुरू ठेवला असून, परिसरात सट्टा आणि अन्य अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी होत्या.

मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी या पार्श्वभूमीवर ५० अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या असून, १० मार्च रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अतिक्रमित घरे आणि दुकाने हटवल्यानंतर रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू करून वाहतूक सुरळीत केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed