मोटसायकलच्या डिक्कीतील ५० हजार रुपये लंपास

0
New-Doc-05-26-2024-09.45.jpg

अमळनेर /प्रतिनिधी. सरकारी दवाखान्याजवळ लावलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यानी ५० हजार रुपये लांबवल्याची घटना २५ रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली.प्रवीण पंडित नेरकर (वय ३२ रा उंदिरखेडा ता पारोळा) हा कलर काम करणारा त्याची मोटरसायकल (क्रमांक एम एच १९ ईएफ ४८२९) वर अमळनेर आला. त्याच्या मोटरसायकलच्या डिक्कीत ५० हजार रुपये होते. काम आटोपून तो गांधलीपुरा भागात आला. मोटरसायकल सरकारी दवाखाण्याजवळ हँडल लॉक करून तो गेला. तिकडून १०:३५ वाजता परत आला असता त्याला त्याची मोटरसायकलची डिक्की उघडी दिसली. त्याचे ५० हजार रुपये कोणीतरी चोरून नेल्याचे उघडकीस आले. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक विकास देवरे व तपास पथकाने या भागातील लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता गांधलीपुरा भागातीलच स्थानिकाने डिक्कीतील पैसे काढल्याचे दिसून आले. आरोपी निष्पन्न होताच पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी गेले असता आरोपी फरार झाले. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed