पारोळा बालसंस्कार प्राथमिक शाळेत शिवजयंती साजरी..
पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – येथील बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिरात शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
शहरातील बालसंस्कार शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले,त्यानंतर बाल कलाकार यांनी शिवरायांवर आधारित इतिहासाचे नाटिका सादर करत भाषणे दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सुचिता पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक उमेश जाधव,भारती जोगी,सविता पाटील,भारती गावंडे,विजय फासगे,नीता बागुल,चेतना शार्दुल,सुवर्णा चौधरी,पुनम नाथजोगी,किशोर पाटील,दर्शना पाटील,प्रिया पाटील यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन विद्यार्थिनी निशा नितीन परदेशी हीने केले.
