शिवसेनेचा पारोळा उपशहरप्रमुख पदी अनिल चौधरी..
पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल रामदास चौधरी (मोठाभाऊ) यांचेसह संजय जैस्वाल,सतिष भोई,रविंद्र चौधरी, देवल भोई,रफिक शेख,विजय चौधरी यांनी आमदार चिमणरावजी पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.यावेळी सर्वांचे अमोल पाटील यांनी शिवसेनेत स्वागत करून शिवसेनेचा पारोळा उपशहरप्रमुखपदी अनिल चौधरी यांची नियुक्ती केली.याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शेतकी संघाचे संचालक प्रकाश पाटील,भैय्यासाहेब पाटील, योगेश पाटील,उद्योजक अमृत चौधरी,पंकज मराठे,मन्साराम चौधरी,मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील,युवा उपशहरप्रमुख नितीन बारी,भिका हाटकर,भावडु चौधरी,गोरख चौधरी,मेहु येथील अनिल पाटील,सिध्दार्थ जावळे, कुंदन पाटील आदी उपस्थित होते.
