अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून ऍक्शन एड धुळे, राष्ट्र सेवा दल, जिल्हा सर्वोदय मंडळ धुळे यांच्या वतीने निवेदन..

0
New-Doc-12-18-2023-15.31.jpg

धुळे /प्रतिनिधि दिनांक 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या मागण्यांबाबत धुळे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना आ. नाजनीन शेख, मधुकर शिरसाट, झीनत मॅडम, रमेश दाणे, एल.आर.राव सर, लोकसंग्रामचे अकबर अली सर उपस्थित होते, या मागणीचे निवेदन धुळे जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आले.

आमच्या प्रमुख मागण्या
1) 19 जुलै 2014 च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्या.
2) केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतुद करा.
3) पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाची कृतीशील अंमलबजावणी करा.
4) तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत 100% शिष्यवृत्ती द्या.
5) जिल्हा निहाय मुस्लिम विद्याथ्यर्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहाची सोय करा.
6) अल्पसंख्यांक समाजावर होणारे हल्ले मॉबलिंचिंग, दंगली होतील तेथे शिघ्र गतीने दोघींवर कारवाई करा व पिडीतांना नुकसान भरपाई द्या.
7) सर्व राजकीय पक्षांमध्ये अल्पसंख्यांक समाजाला योग्य प्रतिनिधीत्व द्या. सर्व जाती,जमातीच्या जातीनिहाय जनगनणा करा, तसेच त्यामध्ये मुस्लिम, ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील जातींची जनगणना करा.
8) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झुंड हत्या विरोधी विशेष व शिघ्र कृती पथकाची स्थापना करा.
9) बार्टी व महाज्योतीच्या धर्तीवर मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग सेंटरची स्थापना करा.
10) दलित, आदिवासी, ख्रिश्नच, मुस्लिम अशा समाजाच्या महिलांवर अत्याचार होणार नाहीत यासाठी कडक कायदे व लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी कायद्यात तरतुद करावी.
11) सरकारी नोकऱ्यांमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या युवक-युवतींचा विचार करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed