गाढवाची उपमा त्यांनी स्वत:लाच दिली- जरांगे पाटील

0
New-Doc-12-10-2023-07.28.jpg

24 प्राईम न्यूज 10 Dec 2023

गाढवाची उपमा त्यांनी स्वतःलाच दिली, असे प्रत्युत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळांना दिले. ते म्हणाले की, तुम्हाला माहितेय की कोण कमी आहे. ते अकलेने आमदार, महापौर झाले नाहीत. तुम्हाला मराठ्यांनी बसवले पदावर. ज्यांनी ज्यांनी पदावर बसवले त्यांना पायाखाली तुडवले. त्याने शिवसेना मोडली, राष्ट्रवादी मोडली. अजून बऱ्याच गोष्टी मोडल्या. आमची मराठ्यांची जात मोडली. ओबीसींच्या जातीही मोडल्या. ओबीसी महामंडळातील ८० टक्के एकट्याने खाल्ले आहेत. त्याला फक्त शब्दांचा खेळ करता येतो. मला सरपंच व्हायचे नाही. तू तर जेलमध्येही जाऊन आलास. कारण तू तुझे पाप फेडत आहेस, असे प्रत्युत्तरही जरांगेंनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed