४ राज्यांचा आज फैसला.
मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण..

0
New-Doc-12-03-2023-08.34.jpg

24 प्राईम न्यूज 3 Dec 2023

आगामी लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज रविवारी ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या ४ राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा यंत्रणांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तसेच राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाच्या या ४ राज्यांच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार, याचे उत्तर रविवारी मिळणार आहे, तर मिझोरामचे निकाल सोमवारी ४ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed