सौ जयश्री पाटील यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा.. – अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव,ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप..

0
New-Doc-11-25-2023-21.37.jpg

अमळनेर/प्रतिनिधि

अमळनेर माजी जिल्हापरिषद सदस्या तथा माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला.
काल दिवसभरात अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर झाला,अमळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.नगाव येथील

महेश पाटील यांनी फळे व बिस्किट उपलब्ध करून दिले,यावेळी सौ जयश्री पाटील तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,इम्रान खाटीक,योगेश पाटील,जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील, खाटीक सर तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान जयश्री पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी गर्दी झाली होती,यावेळी नामदार अनिल पाटील हे देखील उपस्थित होते.विशेश करून महिला भगिनींची मोठी गर्दी यावेळी झाली होती.रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ सुरूच होता,अनेकांनी सामाजिक उपक्रम आयोजित केले असल्याने तेथेही जयश्री पाटील यांनी हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed