राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या.

0
New-Doc-10-15-2023-08.49.jpg

अमळनेर /प्रतिनिधि अमळनेर शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील मयूर संजय साळी वय २६ याने राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
गल्लीत देवीचे आगमन होत असताना मयूर आपल्या मित्रांबरोबर नाचला आणि इकडे देवीची आरती सुरू असताना त्याने घरात जाऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. जयेश साळी याने फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed