नवरात्रोत्सवादरम्यान पोलिसांनी एकवीरा देवी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर…
-नागरिक्कानी भीती न बाळगता उत्सवात सहभागी व्हा. -पुलिस निरीक्षक सतीश एम घोटेकर.
धुळे/अनिस खाटीक
दिनांक १५.१०.२०२३ ते दिनांक २४.१०.२०२३ रोजी पावेतो नवरात्र उत्सव सण साजरा होत असुन देवपुर पोलीस ठाणे हद्यीत संपुर्ण स्वादेशातील प्र
सिध्द ग्राम दैवत आई एकविरा देवीचे मंदिर असून नवरात्रात जळगांव, नंदुरबार, धुळे, नाशिक, वगैरे या जिल्हयातुन तसेच मध्यप्रदशे व गुजराथ या प्रांतातुन देखील भावीक भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. सदर देवी मंदिर परिसरात मोठी यात्रा परंपरेनुसार भरत असते. सदर यात्रा उत्सव काळात देवपुर पोलीस स्टेशनच्या वतीने सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चोक बंदोबस्त लावणेत आलेला आहे. तसेच कुठलीही दुर्घटना घडु नये यासाठी चोख तयारी देखील करण्यात आली आहे.

यात्रेतील गर्दीचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटक, गुन्हेगार, हे यात्रेतील भावीकाचे पीकपॉकिटींग, चैन स्नैचिंग, बॅग लिप्टींग, वगैरे सारखे गुन्हे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीसांची त्याच्यावरती करंडी नजर असणार आहे. त्यादृष्टीने देखील साध्या वेषात पुरुष व महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच देवी विशवस्तकडुन व सामाजिक कार्यकर्ता शेखर वाघ व देवी मंदिर ट्रस्ट यांचे कडुन मंदिर परिसरात सी. सी.टि.व्ही. चे जाळे उभे करण्यात आलेले आहे.
तरी यात्रेत येणारे भावीकांनी कुठलीही भिती मनात न बाळगता आनंद उत्सव साजरा करावा. कुठल्याही प्रकारची संशयीत व्यक्ती / वाहन / वस्तु आढळुन आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा तसेच आपले पाकीट, चैन, दागिणे, लहान मुले, याची काळजी घ्यावी असे आवाहन देवपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सतिश घोटेकर यांनी सर्व नागरिकांना केले आहे. सर्व नागरिकांना नवरात्र सण उत्सवाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. .
देवपुर पोलीस ठाणे संपर्क नंबर
१) ०२५६२-२८८२१९
२) ९८७०४०६८७७
