अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्नच राहणार !
शरद पवारांचां टोला..

0
New-Doc-10-13-2023-07.45.jpg

24 प्राईम न्यूज 13 Oct 2023 मुख्यमंत्री होण्याचे अजित पवार यांचे स्वप्न स्वप्नच राहील, ते प्रत्यक्षात उतरणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी लगावला. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले, “आमची भूमिका स्वच्छ आहे. पक्षात आम्ही फूट पाडली नाही. निवडणूक आयोगासमोर आमचा पक्ष म्हणून म्हणणे मांडण्याची संधी आम्हाला मिळेल, याची मला खात्री आहे. उद्या कुणी युनायटेड नेशन्सचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहील. आमची भूमिका स्पष्ट आहे. जनमानसात आम्हाला मिळणारा प्रतिसाद मतांत परिवर्तित झाला तर आमची सत्ता येईल,’ असे शरद पवार म्हणालेअजितदादा गट भाजपसोबत सत्तेत जाऊन काही दिवसांपूर्वीच १०० दिवस पूर्ण झाले त्यानिमित्त अजित पवारांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार आणि यशवंतराव चव्हाणांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपण्याची ग्वाही जनतेला दिली होती. विशेष म्हणजे या पत्रात त्यांनी स्वतःचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असा केला होता. त्यावर शरद पवारांनी जोरदार चिमटा काढला. शरद पवार म्हणाले, “अजित पवारांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. त्यांनी आता संयुक्त राष्ट्रांचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले तरी काही फरक पडत नाही,” असा चिमटाही पवार यांनी काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed