अमळनेरात ईद- ए -मिलाद गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी होणार साजरी.. -मुस्लिम समाजाने घेतला निर्णय.
अमळनेर( प्रतिनिधि) अमळनेर मध्ये विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद साजरी करण्यात येणार आहे.
मुस्लिम समाजाने हा निर्णय

घेतला अमळनेर ईद-ए-मिलाद 28 तारखेला येणार असून, त्याच दिवशी गणपती विसर्जन होते.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमळनेर पोलिसांनी मुस्लिम समाजाला दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद साजरी करण्याची विनंती केली होती. ज्याच्यामुळे अमळनेर शहरातील सर्व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी व पंच यांनी शहरातील हिंदू-मुस्लिम एकता राखण्यासाठी बैठक घेतली तसेच गणपती हा महत्वाचा सण आहे, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी अमळनेर शहरातील मुस्लिम समाजाचे हाजी नसीर,हाजी शब्बीर पहेलवान,फिरोज पठाण, आरिफ भाय्या, मुख्तार खाटिक,इम्रान खाटिक, रियाझ शेख,इक्बाल शेख,
मुशताक मुजावर,इम्रान खाटीक, आदींनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नांदवाडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना निवेदन दिले.
