निवासी उपजिल्हाधिकारी कासार यांचे क्रीडा,राजकीय व सामाजिक संघटना तर्फे स्वागत..

0
New-Doc-08-31-2023-23.59.jpg


जळगाव ( प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याला निवासी उपजिल्हाधिकारी हे पद रिक्त होते या पदावर वर्धाहून सोपान कासार यांची शासनाने नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी आपल्या कार्याचा चार्ज घेतल्यावर जळगाव शहरातील अल्पसंख्याक समाजातील क्रीडा, राजकीय, सामाजिक व बिरादरीतर्फे प्रातनिधिक स्वरूपात त्यांचे शाल, पुष्पगुच्छ व साने गुरुजी लिखित इस्लाम दर्शन हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरी तथा क्रीडा संघटना तर्फे फारुक शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक चे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, भुसावळ चे माजी नगर अध्यक्ष मुन्ना तेली, हुसैनी सेना चे अध्यक्ष फिरोज शेख, शिकलगर बिरादरीचे अध्यक्ष अनवर सिकलगर, रंगरेज बिरादरीचे दानिश रंगरेज, उस्मानिया पार्कचे समीर शेख व मिर्झा चौक शिवाजी नगर चे प्रमुख राजा मिर्झा यांचा समावेश होता.
फोटो कॅप्शन
निवासी उपजिल्हाधिकारी कासार सोपान कासार यांचे पुष्पगुच्छ, शाल व पुस्तक देऊन स्वागत करताना मुस्लिम शिष्ट मंडळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed