“मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल” असे देवेंदर फडणवीसांनीहीं या आधी म्हटले होते..

0
New-Doc-08-17-2023-09.36.jpg

24 प्राईम न्यूज 17 Aug 2023 १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल
किल्ल्यावरून भाषण करताना पुढच्या निवडणुकीत पुन्हा
सत्तेत येणार असल्याचा दावा केला होता. त्यावर टीका
करताना शरद पवार यांनी “देवेंद्र फडणवीसांनीही या आधी
मी पुन्हा येईन, असे म्हटले होते. ते आले, पण दुसऱ्याच
पदावर,” असा टोला त्यांनी हाणला. मोदी सरकारच्या
अनेक निर्णयांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, आताही
जातीय तेढ निर्माण करण्याची मोदी सरकारची भूमिका आहे.
शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सहकारी भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी मला भेटून पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं आहे. या आधी कोणताही राजकीय निर्णय हे राजकीय नेते घ्यायचे, पण आता राजकीय निर्णय ईडी ही संस्था घेते, असं आपल्या सहकाऱ्यांनी मला भेटल्यानंतर सांगितलं. ईडी ठरवते कोणत्या पक्षात कोण जायचं ते.”
अजित पवार यांच्यासोबत पुण्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपने शरद पवार यांना केंद्रात कृषी मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. याबाबत शरद पवार म्हणाले, “माजी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते मला माहिती नाही, पण ती जी गुप्त बैठक होती, त्यामध्ये कोणत्याही राजकीय गोष्टीची चर्चा झाली नाही. असा खुलासा शरद पवार यांनी केला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed