जुमेराह क्लासेस तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा..

0
New-Doc-08-16-2023-07.16-1.jpg


जळगाव ( प्रतिनिधी) 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जुमेराह क्लासेसच्या वतीने नदीम मलिक स्कूलमध्ये वादविवाद स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयो

जन करण्यात आले होते. यावेळी एकूण 25 लहान मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

जुमेराह क्लासेसच्या शकीला बानो झाकीर शेख या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत


कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्हा मणियार बिरादरी अध्यक्ष फारुख शेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.सय्यद चाँद, ए.रौफ व फारुख कादरी उपस्थित होते व सर्व 25 सहभागी विद्यार्थ्यांना फारुख शेख यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रथम तिघांना चषक देऊन गौरविण्यात आले. विजेते

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शकीला बानो, जाकीर शेख, रहीस खान, परवेज शेख, तोफिक खान, उमर शेख, मोहसीन खान, समिना रईस, साबा शेख, सौबिया शेख, अल्फिया शेख, समीर शेख यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शकीला बानो यांनी केले तर सूत्रसंचालन रेहान करीमी यांनी केले तर आभार झाकीर शेख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed