सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन वेळेत देण्यासाठी उपाययोजना करणार..

0
New-Doc-07-29-2023-07.56.jpg

24 प्राईम न्यूज 29 Jul 2023

जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतनाचे प्रदान वेळेत 1 होण्यासाठी ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि वित्त विभागामध्ये समन्वय साधून पुढील अधिवेशनापूर्वी कायमस्वरूपी कार्यप्रणाली अंमलात आणली जाईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. सदस्य नरेंद्र दराडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर मंत्री महाजन म्हणाले की, जिल्हा परिषदांना निधी वाटप, जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतन देयके कोषागारात सादर करणे व अंतिमतः जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतनाचे प्रदान करणे या कार्यपद्धतीकरिता लागणाऱ्या कालावधीमुळे निवृत्तीवेतन अदा करण्याच्या प्रक्रियेस विलंब होत आहे, असेही महाजन म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed