नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या हस्ते..
धुळे (प्रतिनिधि) धुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला…..
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश पातळीवरील मान्यवर राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती फौजीया ताई खान, महिला प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री माननीय श्री जयंतराव पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदरणीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे तसेच ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या सर्वानुमते आज राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष- शोभाताई आखाडे, प्रदेश सरचिटणीस- छायाताई सोमवंशी, धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी उषाताई पाटील तसेच राष्ट्रवादी युवक कार्यकारणी भोला भाऊ सैंदाणे, कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस -योगेश गोसावी यांच्या नवनियुक्त निवडीबद्दल धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सामूहिक सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष- शोभाताई आखाडे, प्रदेश सरचिटणीस- छायाताई सोमवंशी, धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी उषाताई पाटील यांच्या माध्यमातून मंगलाबाई पाटील तीखी माजी सरपंच, सरलाबाई गवळी सामाजिक दक्षता समिती तिखी, दत्तात्रय पाटील माजी सरपंच तिखी, रामदास भिला, सुवर्णा सोनवणे, वंदना पाटील, ज्योत्सना पाटील तसेच शहर महिला पक्ष प्रवेश – मंगला बाई नवसारी, कविता सोमवंशी, प्रतीक चव्हाण, खुशी सोमवंशी, पूनम पाटील आदी व बहुसंख्य युवक,महिला,पुरुषांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादीचे ग्रामीण कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ भदाने, डॉक्टर सेल प्रदेशचे डॉक्टर अनिल पाटील सर, वी.स.शेत्र अध्यक्ष विजय वाघ, कार्यालय प्रमुख अकबर अली सर, ग्रामीण अध्यक्ष अल्पसंख्यांक सलीम शेख, नगरसेवक- अब्दुल लतिफ अन्सारी, शहराध्यक्ष अल्पसंख्यांक जमीर शेख, कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक आझर पठाण, शकील खजूरवाले, वामन मोहिते, जावेद किराणावाले, डॉक्टर संजय पिंगळे ,दीपक जाधव, मयूर खैरनार, विशाल चित्ते व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती कार्यालय प्रमुख अकबर अली सय्यद सर यांनी दिली व अविनाश लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख यांनी प्रसिद्ध केली. तसेच यावेळी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने देखील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले
