एरंडोल तालुका खुनाने हादरला.. -रवंजे येथील तरुणाचा मृत्यू..

0
New-Doc-07-07-2023-22.01.jpg

एरंडोल ( प्रतिनिधि )

एरंडोल असे आहे खुनाचे प्रकरण खास पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नामदेव कोळी या तरुणाचा शुक्रवारी सकाळी रवंजे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दुचाकीचा कट लावण्यावरून वाद झाला व यापूर्वीच्या वादाची खुन्नस डोक्यात ठेवून चौघा संशयितांनी नामदेव कोळी या तरुणाला बेदम मारहाण केली. संशयितांनी तोंडावर व शरीरावर जोरदार मारहाण केल्याने त्यास बेशुद्धावस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच एरंडोलचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.तालुक्यातील रवंजे येथील 20 वर्षीय तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी रवंजे येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडली. नामदेव अशोक कोळी (20, रवंजे, ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चार संशयितांविरोधात एरंडोल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने एरंडोल तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.चौघा संशयिताने घेतले ताब्यात

😀खून प्रकरणी एरंडोल पोलिसांनी लक्ष्मण गणपत माळी (43), आकाश सोमा कोळी (27), राजेंद्र सुकदेव महाजन (40), सुकलाल ईश्वर माळी (37, सर्व राहणार रवंजे, ता.एरंडोल) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयितांना एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed