अमळनेरच्या प्रतिष्ठेला तडा जावू देवू नका,डीवायएसपी नंदवाळकर… मुस्लिम समाजाचे भाईचाराचे आदर्श उदाहरण…..

0
20230621_100617-BlendCollage.jpg

अमळनेर (प्रतिनिधि)सानेगुरुजी यांच्या पा कर्मभूमीत झालेली दंगल शहराच्या जु प्रतिष्टेला बाधा आणणारी आहे. या बाबीचे आत्मपरीक्षण करा. अमळनेरच्या प्रतिष्लेला तड़ा जावू देवू नका, असे आवाहन

डीवाएसपी सुनील नंदवाळकर यांनी दि १९ अ रोजी सुजाण मंगल कार्यालय येथे घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अमळनेरच्या प्रा सुजाण नागरिकांना केले.शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी उपस्थित होते.
यावेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर म्हणाले की, अमळनेरला आदर्श इतिहास आहे. त्याला तडा जाऊ देऊ नका. शहरातील दंगलीची पार्श्वभूमी पाहता सामाजिक सलोखा राखण्यासाठी अमळनेरातील मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी देणार नाही असा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेऊन भाईचाराचे आदर्श उदाहरण घालून दिले. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी मुस्लिम समाजाला घातलेल्या भावनिक सादाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दोन्ही समाजातील मूठभर समाज कंठकाना मोठी चपराक बसली आहे. अमळनेरची अस्मिता जपून
ठेवा. प्रत्येकाने आपले स्वतःचे घर आणि आजूबाजूचे घर शांत केले तरी दंगल होणार नाही. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले की, सर्वच अपेक्षा पोलिसांकडून करण्यापेक्षा समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. दगड फेकणारा जितका दोषी आहे, तितका त्याच्या डोक्यात दगड
भरणाराही आहे. यावेळी प्रा. अशोक पवार, अॅड. ललिता पाटील, अॅड. शकील काझी, संजय पाटील, आरिफ भाया, प्रवीण पाठक, सचिन पाटील, धनंजय सोनार, रियाज मौलाना आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय शिंदे, सूत्रसंचालन डॉ. शरद पाटील, आभार रणजित शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed