पाऊस लांबल्यामुळे पूर्व हंगामी कापूस लागवड धोक्यात..!

0
New-Doc-06-10-2023-21.46.jpg


एरंडोल( प्रतिनिधि) तालुक्यात पूर्व हंगामी कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
यावर्षी ही विहिरींमध्ये असलेल्या जेमतेम पाण्यावर दिनांक २५ मे पासून कापूस लागवड सुरू करण्यात आली होती. ठिबक सिंचन संच वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी सरीवर कापूस लागवड केली आहे.
मृगाचे दोन दिवस उलटूनही पावसाचा थांग पत्ता नाही.
रोहिणी नक्षत्रावर केलेली कापूस लागवड ही मृगाच्या भरवशावर असते. मात्र मृगाचे दोन दिवस उलटूनही पावसाचे कुठलेही चिन्ह दिसत नाही तर ४२डिग्री तापमानामुळे कपाशीचे इवलेसे कोंब तीव्र उन्हाच्या फटक्यामुळे कोमेजू लागले आहेत. पाऊस नसला तरी ढगाळ वातावरणामुळे ‘मृगछाया’ राहील्यामुळे पिकांना पाणी कमी लागेल अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र या उलट कडक ऊन पडत असल्याने कपाशीच्या पिकाला पाण्याची नितांत गरज भासत आहे. विहिरींनीही आता तळ गाठला आहे. त्यामुळे पूर्व हंगामी कापूस लागवड धोक्यात आली असून महागडे बियाणे,खते जमिनीत ओतले गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. मात्र मृग नक्षत्र बरसते कधी..? ही एकच चर्चा ग्रामीण भागात ऐकायला मिळत असून शेतकरी वर्ग चिंताक्रांत झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed