दगडफेकीच्या घटने नंतर अमळनेरात 144 कलम लागू..
जिंगर गल्ली पांनखिडकी भागात शुक्रवारी रात्री दोन गटांत हाणामारी होऊन तुफान दगडफेक झाली. त्या अनुषंाने आज सकाळी अमळनेरात कलम 144 लागू करत संचारबंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दिले आहेत. दिनांक 10 जून सकाळी 11 वाजेपासून 12 रोजी ॥ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचारी, रुग्णसेवा, पाणीपुरवठा, दूध वितरण, सार्वजनिक वितरण सेवा, बँका, विवाह सोहळे, अंत्यविधी, यांना लागू राहणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.
