भाजपा जळगाव सोशल मिडिया मेळावा, माजी कृषी मंत्री कर्नाटक विधानसभेचे आमदार अरविंदजी लिंबावली व प्रदेश सोशल मिडिया संयोजक प्रकाशजी गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…

0
New-Doc-06-09-2023-23.29.jpg

जळगाव ( प्रतिनिधि )

देशाचे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले असून, या निमत्ताने देशभरात भाजपा मार्फत मोदी@9 “महाजनसंपर्क अभियान” सुरू आहे. या अनुषंगाने आज भाजपा जळगांव लोकसभेची “सोशल मीडिया कार्यशाळा व मेळावा” चे ब्राह्मण सभा, बळीराम पेठ जळगाव येथे संपन्न झाला माजी कृषी मंत्री कर्नाटक विधानसभेचे आमदार अरविंद लिंबावली व प्रदेश सोशल मिडिया संयोजक प्रकाशजी गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. राजू मामा भोळे, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, माजी मंत्री आमदार संजयजी सावकारे, महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, उ.म.सो.मिडिया प्रभारी दिपक जगताप, प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती स्मिताताई वाघ, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, प्रदेश चिटणीस अजय भोळे,महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी,जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.रेखाताई पाटील, ह.भ.प.जळकेकर महाराज, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, जिल्हा सोशल मिडिया संयोजक गणेश माळी, जिल्हा सोशल मिडिया सहसंयोजक श्री.भरत सोनगिरे, जळगाव लोकसभा सो.मि.संयोजक अक्षय चौधरी, रावेर लोकसभा सो.मि.संयोजक पंकज भारंबे, आत्मनिर्भर भारत योजना जि.सहसंयोजक मिलिंद वाणी, भाजयुमो जिल्हा सहसंयोजक हेमंत देवरे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, सर्व भाजपा तालुकाध्यक्ष, प्रमुख तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार तसेच जिल्ह्यातील सोशल मिडिया पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed