श्री.प्रकाश कोतकर यांचे दुःखद निधन.सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान..

0
New-Doc-05-22-2023-09.45.jpg

अमळनेर – येथील विप्रो कंपनी मधील निवृत्त स्टोअर मॅनेजर श्री.प्रकाश बाबुराव कोतकर वय ७२ यांचे काल दि.२१ रोजी सकाळी ९ वा. अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्यावर काल संध्याकाळी संगमनेर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात १ मुलगा, २ मुली, जावई, नात-नातू असा परीवार असून ते आर्थिक सल्लागार श्री.अतुल कोतकर यांचे वडील होते.

कै.श्री.प्रकाश बापू यांनी लाडशाखीय वाणी पंच मंडळाचे संचालक म्हणून १५ वर्षे कामकाज पाहिले होते. तसेच अमळनेर टॅक्सी मेन्स युनियन या संघटनेची स्थापना करण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

अमळनेरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक सक्रिय व्यक्तिमत्त्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed