सोयगाव तहसील कार्यालयात महसूल क्रीडा मैदान;उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन…
सोयगाव,(आमोल बोरसे) महसूल कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळण्यासाठी जिल्हा महसूल विभागाने क्रीडा मैदान उपलब्ध करून दिले आहे या क्रीडा मैदानाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी चार

सीयगाव तहसील कार्यालयात क्रीडा मैदानाचे उदघाटन करतांना उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम व इतर.
वाजता करण्यात आले.
जिल्हा क्रीडा स्पर्धेत तालुका स्तरांवर महसूल खेळाडू तयार व्हावे तसंच महसूल कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळावे यासाठी सोयगाव तहसील कार्यालयात क्रीडा मैदानाचे उदघाटन करण्यात आले यावेळी तहसीलदार रमेश जसवंत नायब तहसीलदार गोरक्षनाथ सुरे निवडणूक विभागाचे हेमंत तायडे महसूल सहायक शरद पाटील शिपाई अनिल पवार संतोष नवगिरे दीपक फुसे आदींची उपस्थिती होती या मैदानावर मैदानी खेळ तसेच व्हॉलीबॉल सह इतर सर्व खेळांची साहित्य उपलब्ध करून दिले असल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले त्यामुळे आता महसूल कर्मचाऱ्यांना महसूल क्रीडा स्पर्धेत चांगले खेळाडू तयार होण्यासाठी या मैदानाची मदत होईल असे उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले…
