राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयवंतराव पाटील यांच्या २६ रोजी धुळे नंदुरबार जिल्हा दौरा..

0
IMG-20230324-WA0055.jpg

धूळे ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयंतराव पाटील साहेब यांचा धुळे नंदुरबार जिल्ह्याचा दिनांक २६ मार्च् २०२३ रोजीचा कार्यक्रम ठरला आहे. सदर दौर्‍याची पूर्व तयारी करण्यासाठी काल दिनांक २३ मार्च २३ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काॅंग्रेस भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर आयोजित बैठकीमध्ये धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेल आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश अध्यक्ष साहेबांच्या दौऱ्या विषयी सुरवातीस यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ संस्थापक अध्यक्ष श्री एन सी आबा पाटील,अल्पसंख्यांक विभागाचे अकबर अली सय्यद सर, डॉक्टर सेलचे प्रदेशचे डॉक्टर अनिल पाटील सर, कामगार आघाडी प्रमुख श्री संजय भाऊ बगदे, सामाजिक न्याय विभाग महिला आघाडीच्या शोभाताई आखाडे,युवक आघाडीचे भोला भाऊ सैदाणे आदि मान्यवरांनी पक्षातील सध्याच्या चालू घडामोडीं विषयी आपापली भूमिका मांडली.तसेच बैठकीच्या सर्वात शेवटी माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळातील लोकसभा,विधानसभा,महापालिकेच्या निवडणुकांविषयी सूतोवाच करीत धुळे जिल्ह्यातील पक्षातील शिस्तीविषयी कानउघाडणी करीत सुचित केले
धुळे शहराचे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य जेष्ठ कै.एबी आबा पाटील साहेब तथा कै.सुधाकर अप्पा बोरसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच पुन्हा दिनांक २५ मार्च २०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात येत असून त्या संबंधी माहिती देण्यात येईल असे सांगीतले. यावेळी बैठकीस धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य अध्यक्ष श्री तेजस आप्पा गोटे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री विजय भाऊ वाघ, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सलीम भाई शेख, नगरसेवक मंसूरी भाई,युवक आघाडीचे डॉ मनोज महाजन महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोजताई कदम तसेच विविध सेलचे आघाडी प्रमुख तसेच युवक युवती महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed