पांझरा नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करताना एकास अटक..

0
PhotoScanner_1679634363633.jpg

अमळनेर ( प्रतिनिधि ) पांझरा नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करताना बेटावद येथील एकाला पकडून ट्रॅक्टरसह वाळूसह तीन लाख तीन हजार पाचशे (३,०३,५००) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील व पोलीस उज्वल पाटील यांनी २३ रोजी सकाळी ७ वाजता बेटावद कडून भरवस गावाकडे येताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ , एम ४९४ वाळू वाहतूक करताना आढळून आले. हे ट्रॅक्टर बाळा उर्फ गिरीश जयवंतराव पाटील रा बेटावद ता शिंदखेडा याचे असल्याचे समजले. पोलिसांनी ट्रॅक्टर ,ट्राली सह वाळू मारवड पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आले असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांनी वाळू वाहतूक करणाऱ्यान विरोधात शासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed