जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी जी. एस. हायस्कूलचा संघ सज्ज! १७ वर्षांखालील गटात विजय मिळवत अमळनेरच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; शाळेच्या पदाधिकाऱ्यांकडून खेळाडूंना शुभेच्छा.
अमळनेर/आबीद शेख 
अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल, अमळनेर येथील १७ वर्षांखालील मुलांच्या खो-खो संघाने स्पर्धेत विजय मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे. हा संघ गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील व. वा. वाचनालयात आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी होणार आहे.
या संघाचे नेतृत्व कर्णधार दुर्गेश सोनवणे करणार असून, संघात कुणाल पवार, यश मिस्त्री, अनंत संदानशिव, लक्षराज पाटील, नाविण्य धनगर, वैभव गुरव, तेजस पाटील, मयूर पाटील आणि चेतन पाटील या खेळाडूंचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे आणि अमळनेरचे नाव उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने संघातील खेळाडू सज्ज झाले आहेत. या खेळाडूंना शालेय समितीचे चेअरमन अण्णासाहेब श्रीहरी भिका वाणी, मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, उपमुख्याध्यापक सी. एस. सोनजे, के. पी. पाटील, क्रीडा विभागप्रमुख के. आर. बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी आर. जे. पाटील, शाळेचे शिक्षक प्रतिनिधी पी. एस. काटकर तसेच संघाला मार्गदर्शन करणारे जे. व्ही. बाविस्कर आणि के. डी. साळुंखे यांनी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या क्रीडा परंपरेत भर घालत जिल्हास्तरीय स्पर्धेतही संघाने यश संपादन करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

