पशुसंवर्धन व पशुधन विकास कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद सहाशेवर नागरिकांची उपस्थिती; अनुलोम, पशुसंवर्धन विभाग आणि मंगळग्रह सेवा संस्थेचा संयुक्त उपक्रम

अमळनेर : अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम), पशुसंवर्धन विभाग, अमळनेर आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी श्री मंगळग्रह मंदिराते पशुसंवर्धन व पशुधन विकास कार्यशाळा झाली. या कार्यशाळेस अमळनेरसह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत जवळपास सहाशेवर नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, पशुधन आरोग्य व्यवस्थापन आणि शासनाच्या विविध योजनांची मान्यवरांनी माहिती दिली.

पशुपालकांना आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, पशुधन विकासाच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यावेळी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या प्रशिक्षण प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पशुसंवर्धनविषयक शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अनुलोम संस्थेमार्फत शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. संजय कुवर, डॉ. समाधान पाटील, डॉ. संदेश वाटोळे, डॉ. दीपक पाटील, डॉ. कल्याण थोरात आणि निलेश राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अनुलोमचे जळगाव उपविभाग जनसेवक प्रवीण दांडगे, विभाग कार्यकर्ते विनोद माळी, जळगाव उपविभाग संवादिनी सौ. नयनाताई पाटील, डॉ. मनोहर सोनवणे, राहुल पाटील, सौ. भाविकाताई पाठक, सौ. संगीताताई पाटील, घनश्याम पाटील, वीरभूषण, शैलेश पाटील, विजय पाटील, अमर सोनार आणि एकनाथ जाधव यांनीही सहभाग नोंदविला.
शासकीय योजनांची माहिती, आधुनिक पशुपालनाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रमाणपत्रांच्या वाटपामुळे पशुपालकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. यावेळी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही दाखविण्यात आले. शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
अमळनेर : नुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम), पशुसंवर्धन विभाग, अमळनेर आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी श्री मंगळग्रह मंदिराते पशुसंवर्धन व पशुधन विकास कार्यशाळा झाली. या कार्यशाळेस अमळनेरसह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मनोहर सोनवणे. शेजारी व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, डॉ. संदेश वाटोळे, डॉ. संजय कुवर, डॉ. कल्याण थोरात, प्रवीण दांडगे, विनोद माळी, सौ. नयनाताई पाटील.

