एरंडोल येथे शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये संपामुळे शुकशुकाट.

0
IMG-20230314-WA0071.jpg


एरंडोल (प्रतिनिधि) शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी

संपात येथील तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय यांच्यासह इतर सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय व शाळा कॉलेज मधील शिक्षण संस्थांमध्ये मंगळवार या संपाच्या पहिल्या दिवशी कामकाज ठप्प झाले कार्यालय ओस पडली कार्यालयांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले. शिक्षण संस्थांचे कामकाज बंद झाल्यामुळे बच्चे कंपनीसह इतर विद्यार्थ्यांनी सुट्टीचा आनंद घेतला.
तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन निदर्शने केली तर पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी दादाजी जाधव यांना संपाबाबत सोमवारी निवेदन दिले. या संपात कार्यालयीन कर्मचाऱ्यांबरोबर तलाठी, ग्रामसेवक, हे सुद्धा सहभागी झाले शिक्षक संघटना सुद्धा संपात उतरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed