अमळनेरच्या पाणीटंचाईच्या संकटात ‘जय नील फाऊंडेशन’चा मदतीचा हात.महापुरात पाईपलाईन वाहून गेल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईत नागरिकांना पाण्याचे अनमोल सहकार्य.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : अमळनेर शहराला आलेल्या महापुरामुळे शहराची पाण्याची मुख्य पाईपलाईन वाहून गेल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांसमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या कठीण प्रसंगी नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन जय नील फाऊंडेशन यांच्या वतीने पाण्याचे अनमोल सहकार्य करण्यात येत आहे. संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना जय नील फाऊंडेशनच्या या सहकार्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. आपत्तीच्या काळात केवळ मदतीचे आश्वासन न देता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे, हीच खरी समाजसेवा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.
अमळनेरकरांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे केल्याबद्दल जय नील फाऊंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

