कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला नवे वळण; विजय चौधरी यांना चार दिवसांची पोलीस कोठडी.

0

24 प्राईम न्यूज 8 Aug 2026

नंदुरबार, प्रतिनिधी : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजप नेते विजय चौधरी यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने ही कोठडी मंजूर करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीवरून संबंधित गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने विजय चौधरी यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या कालावधीत विजय चौधरी यांची सखोल चौकशी करण्यात येणार असून, प्रकरणाशी संबंधित पुरावे, कथित ऑडिओ क्लिप आणि इतर बाबींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

दरम्यान, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed