‘ज्युनियर अमीन सयानी’ म्हणून परिचित अब्दुल रहिम अब्दुल नबी यांचे दुःखद निधन.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर शहरातील अंदरपुरा मोहल्ला येथील मूळ रहिवासी तथा सध्या शाह आलम नगर येथे वास्तव्यास असलेले अब्दुल रहिम अब्दुल नबी यांचे मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सन १९७० च्या दशकात ते उंट बिडीचे प्रचारक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रभावी आवाजामुळे, आकर्षक निवेदन शैलीमुळे आणि दमदार सादरीकरणामुळे त्यांना “ज्युनियर अमीन सयानी” म्हणून ओळखले जात असे. त्यांनी आपल्या कार्यशैलीतून अनेकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.


त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, जावई, भाऊ तसेच नातवंडांसह मोठा परिवार आहे. ते आवास बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष तनवीर पेंटर तसेच रंगोली आर्ट्सचे संचालक सगीर पेंटर यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed