अमळनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन. वीजबिल माफ आणि शेतकर्यांच्या कांदा, कापूस उत्पादनाला योग्य भाव द्यावा.
अमळनेर(प्रतिनिधी) वीजबिल माफ आणि शेतकर्यांच्या कांदा, कापूस उत्पादनाला योग्य भाव द्यावा आदींसह शेतकरी हिताच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
यासंदर्भात प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला असला तरी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची गरज आहे त्या बाबींचा उल्लेख यात कुठेच नसल्याने आज छत्रपती शिवरायांना वंदन करून आपणास शिवरायांची शपथ देऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात. यात शेतकऱ्यांच्या कापूस आणि कांदा उत्पादनाला योग्य भाव मिळावा. शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच्या वीज पंपाची विज बिल माफ करण्यात यावे. खान्देशातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी निम्न तापी प्रकल्प पाडळसरेला ठोक 300 कोटींचा निधी द्यावा. शेतकऱ्यांच्या मागील नुकसान भरपाई तसेच आता झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी. जर 2005 नंतर निवडून आलेल्या आमदारांना पेन्शन मिळते तर सरसकट जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी. शेतकऱ्यांना सर्व महागड्या आरोग्य सुविधा मोफत देण्यात याव्यात, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख कल्याण साहेबराव पाटील, तालुकाप्रमुख श्रीकांत अनिल पाटील आणि माजी शहर प्रमुख प्रताप शिंपी,उपशहर प्रमुख अनंत रमेश निकम, उपतालुकाप्रमुख रवींद्र पंडित पाटील, समन्वयक उमेश अंधारे, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब खर्डे, उपशहर प्रमुख प्रमोद शिंपी, जगन्नाथ दशरथ पाटील, निंबा पंडित पाटील, राकेश रामकृष्ण पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब भिकनराव पवार, भैयासाहेब बारकू पाटील, उपतालुकाप्रमुख गणेश राजेंद्र मोरे, विश्वास सोनवणे, चंद्रशेखर भावसार, देवेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर गंगाराम पाटील, मयूर पाटील, राजेंद्र शामराव वानखेडे आदींच्या सह्या आहेत.
