जितेंद्र पारख यांची लायन्स क्लब अमळनेरच्या अध्यक्षपदी निवड; २७ जून रोजी पदग्रहण सोहळा.
अमळनेर | आबिद शेख

सामाजिक सेवा, आरोग्य जनजागृती, शैक्षणिक मदत आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांमुळे शहरात वेगळी ओळख निर्माण केलेल्या लायन्स क्लब, अमळनेरच्या सन २०२६–२७ या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून जितेंद्र पारख यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीत प्रा. जयेश गुजराथी यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून कुमारपाल कोठारी यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. सदस्यांच्या एकमताने निवड झाल्याने आगामी वर्षात सेवाभावी आणि समाजाभिमुख उपक्रमांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लायन्स क्लब, अमळनेरने मागील अनेक वर्षांत आरोग्य शिबिरे, रक्तदान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, पर्यावरण संवर्धन तसेच दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी विविध सेवा प्रकल्प राबवत समाजात मोलाचे योगदान दिले आहे. नव्या कार्यकारिणीने या कार्याचा वारसा पुढे नेत अधिक व्यापक स्तरावर सेवा कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शनिवार, दि. २७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता बन्सीलाल पॅलेस, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास MJF लायन द्वारकाप्रसाद जालन (पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन, पुणे) तसेच लायन जितेंद्र जैन (झोन चेअरपर्सन) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास क्लबचे सदस्य, पदाधिकारी, माजी पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
