अमळनेर येथे समर व्हेकेशन क्रिकेट कॅम्पचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्.

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर, दि. १ जून २०२६ – अमळनेर शहर व तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या आयोजनातून तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव आणि स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या समर क्रिकेट कप व समर व्हेकेशन क्रिकेट कॅम्पच्या पारितोषिक वितरण समारंभाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे झालेल्या या कार्यक्रमास जळगाव येथील जैन स्पोर्ट्स क्लबचे देशपांडे साहेब, निरज अग्रवाल, संजय पवार, सचिन पवार यांच्यासह खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॅम्पदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट साहित्य, ट्रॉफी आणि प्रशस्तीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी शिस्त, कठोर परिश्रम, सातत्य आणि समर्पण यांचे महत्त्व अधोरेखित केले.

समर व्हेकेशन क्रिकेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांच्या क्रिकेट कौशल्यात लक्षणीय वाढ झाली असून भविष्यात दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. पारितोषिक वितरणानंतर खेळाडू, पालक आणि मान्यवरांनी कॅम्पच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वर्षीही अशाच प्रकारच्या उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.
