उसनवारीच्या पैशांवरून अमळनेरमध्ये मारहाण; धारदार शस्त्राने हल्ला..

0
New-Doc-02-19-2026-10.23-1.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : उसनवारीने दिलेले पाच हजार रुपये परत न दिल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना १५ तारखेला रात्री ८ वाजता ताडेपुरा येथे घडली.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फकिरवाडा ताडेपुरा येथील रोहित भरत फतरोड याने १५ दिवसांपूर्वी विकी सपकाळे यांच्याकडून ५ हजार रुपये उसनवार घेतले होते. या पैशांची परतफेड करण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता.
दरम्यान, १५ रोजी वरणेश्वर महादेव मंदिर येथे कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रोहित गेला असता तेथे विकी सपकाळे याने उसनवारीच्या पैशांसह व्याजाची मागणी करत वाद घातला.
यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास विकी सपकाळे हा राज जीभाऊ वाघ, गुड्डड्या रमेश वाघ व अनिल अरुण वाघ यांना सोबत घेऊन आला. चौघांनी मिळून रोहितला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विकीने धारदार शस्त्राने रोहितच्या कपाळावर वार केला.
या प्रकरणी संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed