विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ; कै. भरत साहेबराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावखेडा शाळेत शालेय साहित्याचे वाटप.

0
New-Doc-01-12-2026-09.43.jpg


आबिद शेख/अमळनेर
सावखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कै. भरत साहेबराव कदम यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांप्रती कै. भरत कदम यांचे असलेले प्रेम, आपुलकी व शिक्षणाविषयीची आस्था जपण्याच्या उद्देशाने त्यांच्या कुटुंबीयांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.
कै. भरत साहेबराव कदम यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून श्रीम. विद्या भरत कदम, त्यांचे चिरंजीव श्री. पुष्कराज भरतराव कदम तसेच समस्त कदम परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आवश्यक मदत मिळावी, त्यांच्या शिक्षणाची ओढ कायम राहावी आणि आत्मविश्वास वाढावा, या भावनेतून वह्या, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बिऱ्हाडे मॅडम, उपशिक्षिका जयश्री बारड मॅडम व स्मिता सोनवणे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कदम परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण गावातून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed