“सुंदर माझे शहर… सुंदर माझा परिसर – जसे सुंदर माझे घर”: प्रभाग 13 (ब) मधून महाजन सुनिल दयाराम यांची लोकाभिमुख उमेदवारी..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर :अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज क्रमांक ४ मधून प्रभाग क्र. १३ (ब) येथे महाजन सुनिल दयाराम यांनी लोकसेवेचा ध्यास घेत निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केला आहे. स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल, नवपरिवर्तनवादी, सुधारणावादी तसेच समाजसेवक अशी ओळख असलेले सुनिल महाजन हे आपल्या प्रभागासाठी एक कार्यक्षम, प्रामाणिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व देण्यास कटिबद्ध असल्याचे मतदारांना स्पष्टपणे सांगत आहेत.

सुनिल महाजन आपल्या प्रचारामध्ये वारंवार सांगतात —
“मी कुठलाही ‘मीपणा’ न ठेवता, माझ्या शहराचा आणि माझ्या परिसराचा विचार माझ्या स्वतःच्या घरासारखा करेन.”
ते पुढे नमूद करतात की, केवळ घोषणांनी किंवा आश्वासनांनी कामे होत नाहीत, तर क्रियाशीलता आवश्यक आहे. “बोलाचं कढी, बोलाचा भात” नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून विकास साधण्याची हमी ते मतदारांना देतात.
💪 प्रामाणिकतेची शपथ – “ना खाऊंगा… ना खाने दूंगा”
सुनिल महाजन यांनी आपल्या निवडणुकीच्या भूमिकेत स्पष्ट केले आहे की,
भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन हेच त्यांचे ध्येय आहे.
ते ठामपणे सांगतात —
“मी बोलतो तेच करतो… आणि सांगतो आहे तेच करणार आहे.”
एक निस्वार्थी, ध्येयवादी आणि सेवाभावी उमेदवार म्हणून ते प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी न्याय्य, प्रामाणिक आणि बांधिलकीची कामे करण्याचा शब्द देतात.
प्रभागासाठी महत्त्वाच्या विकासकामांची दिशा
सुनिल महाजन यांनी नागरिकांना दिलेल्या वचनांमध्ये खालील प्रमुख मुद्दे आहेत: स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित परिसर निर्मिती पाणीपुरवठा, ड्रेनेज व रस्ते सुधारणा कचरा व्यवस्थापनाची सुधारित पद्धत महिलांसाठी सुरक्षित वातावरण व सुविधा युवकांसाठी मार्गदर्शन, क्रीडा व रोजगार संधी ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यकारी योजना परिसरातील अनुशासन, शिस्त आणि नियोजनबद्ध विकास
“सुंदर शहर – सुंदर परिसर” हे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते प्रभागातील प्रत्येक घरात पोहोचून जनजागृती करत आहेत.
नागरिकांना नम्र आवाहन
“आपल्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नाही,” असे सांगत
महाजन सुनिल दयाराम नागरिकांना आवाहन करतात—
“अ.नं. ४ बॅट चिन्हासमोरील बटन दाबून मला आपल्या सेवेची एकदाच संधी द्या. हा विजय माझा नाही… तो तुमचाच आहे!”
शैक्षणिक व सामाजिक पार्श्वभूमी
सुनिल महाजन यांची शैक्षणिक पात्रता प्रभावी असून, दीर्घ अनुभव व सामाजिक बांधिलकी त्यांना अधिक सक्षम नेतृत्त्व देते.
M.A. (History)D.Ed.B.A. (English & History) SET (History) पात्र Double PET (PhD)
संचालक – कृष्णार्जुन स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर
स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल
नवपरिवर्तनवादी, सुधारणावादी व समाजसेवक
