प्रभाग १३ (ब) मध्ये हाजी सलीम शेख फत्तू यांना जनतेचा वाढता विश्वास – तडफदार, संयमी आणि कार्यकुशल नेतृत्वाची निशाणी”

0
New-Doc-11-29-2025-07.44-1.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :प्रभाग क्र. १३ (ब) सर्वसाधारण मतदारसंघात नगरसेवक पदाचे उमेदवार हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री) यांच्या प्रचाराला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या सेवेसाठी – जनतेच्या हितासाठी या ध्येयाने प्रेरित झालेल्या या उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे.

हाजी सलीम शेख फत्तू हे लक्ष्यभेदी, संयमी, सत्यवाचनी, कार्यकुशल आणि तडफदार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. प्रभागातील सर्वसामान्यांशी घट्ट नातं जपणारे, प्रश्न ऐकून तत्काळ तोडगा काढण्याची वृत्ती ठेवणारे असे ते जनतेच्या मनाला भावणारे नेते आहेत.

त्यांची निशाणी मतदारांपर्यंत जोरदार पोहोचत असून युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास वाढताना दिसत आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मांडलेले विचार आणि काम करण्याची तळमळ लोकांना आपली वाटत आहे.

मतदारांमध्ये एकच आवाज —
“प्रभाग १३ (ब) च्या विकासासाठी हाजी सलीम शेख फत्तूच योग्य पर्याय!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed