“लोकांचा हक्काचा माणूस” सलीम शेख (शेखा मिस्त्री) यांना प्रभाग १३(ब) मध्ये उत्स्फूर्त पाठिंबा

0
New-Doc-11-22-2025-07.44.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक १३ (ब) मधून सर्वसाधारण पुरुष मतदार संघासाठी शेख सलीम फत्तू (हाजी शेखा मिस्त्री) यांनी नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत असलेल्या हाजी शेखा मिस्त्री यांची साधी, सर्वसामान्यांशी जोडलेली प्रतिमा हीच त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते.

उमेदवारी जाहीर करताना त्यांनी सांगितले की,
“लोकांच्या विश्वासाला पात्र ठरून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवणे हेच माझे उद्दिष्ट आहे. लोकांसाठी, लोकांमधून आणि लोकांचाच नगरसेवक बनणे हा माझा संकल्प आहे.”

शेख सलीम फत्तू यांनी विकासाभिमुख, स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, प्रकाशयोजना, स्वच्छता तसेच सामुदायिक सुविधा अधिक मजबूत करण्यावर ते भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक पातळीवर त्यांच्याबद्दल जनतेत चांगले समाधान आणि विश्वासाचे वातावरण असून मतदारांमध्येही त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या हाजी शेखा मिस्त्री यांच्या उमेदवारीला या निवडणुकीत चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed