एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ‘मोकळी सूट’? पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

0
New-Doc-11-05-2025-11.22.jpg

24 प्राईम न्यूज 5 Nov 2025
जळगाव : एमआयडीसी परिसरात अवैध दारू, जुगार, गुन्हेगारी टोळ्या आणि गोळीबाराच्या घटनांवर पोलिसांकडून तात्काळ कारवाई न होत असल्याने ‘जळगाव जिल्हा एकता संघटना’ यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर दारू व्यवसाय, जुगार व गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते प्रमाण तसेच अलीकडील गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी राहुल रमेश बऱ्हाटे, त्याची पत्नी आणि या प्रकरणातील “मास्टरमाइंड” विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की —

  1. आरोपीवर यापूर्वी एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली असूनही आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी.
  2. आरोपी राहुल बऱ्हाटेवर मकोका किंवा एमपीडीए अंतर्गत तात्काळ कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी.
  3. राज्य उत्पादन शुल्क व एलसीबीमार्फत अवैध दारू व जुगार रॅकेटविरुद्ध विशेष पथक तयार करून संबंधित परवानग्या रद्द करण्यात याव्यात.

या अर्जावर फारूक शेख, नदीम मलिक, आवेश शेख, अनीस शाह, हाफिज रहीम पटेल, आरिफ देशमुख, हाजी युसूफ शेख, सईद शेख, रज्जाक पटेल, सुलतान मिर्झा, अकील मनियार, रियाजुद्दीन शेख, मौलाना कासिम नदवी, अबुजर मिर्झा, इद्रीस खान, विकार खान, वकार शेख, जकी पटेल, राहिल अहमद, अरबाज खान व कारी शफीक अहमद यांचे स्वाक्षऱ्या आहेत.

संघटनेचे फारूक शेख यांनी चेतावणी दिली की, “जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर नागरिक मोठ्या जनआंदोलनाचा मार्ग अवलंबतील.”

या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री, अल्पसंख्यांक व मानवाधिकार आयोग, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक आणि जळगावचे जिल्हाधिकारी यांना सुद्धा पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed