“वॉक फॉर युनिटी” उपक्रम अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे — नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर भारताचे पहिले गृहमंत्री मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे “वॉक फॉर युनिटी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील महाराणा प्रताप चौक येथून सुरू होणार आहे.

या उपक्रमात अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालय व शाळांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार तसेच तरुण मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

“वॉक फॉर युनिटी” या कार्यक्रमाचा उद्देश समाजात एकात्मता, बंधुता, सलोखा आणि राष्ट्रीय एकता दृढ करण्याचा आहे. या उपक्रमाद्वारे सरदार पटेल यांच्या एकसंघ भारताच्या कार्याचा आदर्श नागरिकांसमोर ठेवला जाणार आहे.

