श्री शनेश्वर मित्र मंडळ गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन..

0
New-Doc-09-04-2025-21.20-1.jpg


आबिद शेख/अमळनेर

पिंपळे येथे श्री शनेश्वर मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रांगोळी, चित्रकला, निबंध तसेच संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि सृजनशीलता विकसित व्हावी या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गणेशाची विविध रूपे रांगोळीच्या माध्यमातून साकारली, तर सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी “पाणी आडवा-पाणी जिरवा” आणि “पर्यावरण समतोल” या विषयांवर रांगोळीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. पानं, फुलं आणि विविध रंगसंगतीचा वापर करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे सुंदर चित्रण केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मिराबाई चौधरी, कल्याणी चौधरी, मानसी चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील तसेच ओम साई क्लासेस चे संचालक ज्ञानेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेस विशेष सहकार्यही करण्यात आले.

स्पर्धांचे निकाल ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी महिला मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 108500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 99800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 82500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed