रुंधाटीतील रामराज्य गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर यशस्वी..

आबिद शेख/अमळनेर
गणेशोत्सवाच्या पावन पर्वात अमळनेर तालुक्यातील रुंधाटी येथील रामराज्य गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 31 तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
हे शिबिर अमळनेर जीवनश्री ब्लड बँकेच्या सहकार्याने पार पडले. पत्रकार सागर मोरे यांनी विशेष सहकार्य केले. शिबिराचे उद्घाटन उपसरपंच प्रमोद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस पाटील शैलेश पवार, जितू पवार, दिलीप पवार, विजय पवार यांनी मार्गदर्शन केले.
“एक दिवस गावासाठी” या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या उपक्रमात भूषण पाटील, दीपक भिल, राहुल पवार, प्रवीण पवार, गोपाल पवार, अनिल पवार, हर्षल पाटील, सूर्यकांत पवार, निलेश पाटील, सचिन पाटील यांसह 31 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जीवनश्री ब्लड बँकेचे योगेश महाले, टेक्निशियन शुभांगी माळी, गौरव पालीवाल, सुनीता गावित आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 107700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 99000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 81900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
