रणाईचे शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अल्पोपहार वाटप..
आबिद शेख/अमळनेर

रणाईचे (ता. अमळनेर):
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणाईचे येथे दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी गावातील नागरिक कै. कौतिक ओंकार जाधव यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या पत्नी सौ. शकुंतला ताई जाधव, सुपुत्र पोलीस इन्स्पेक्टर (मुंबई) श्री. गणेश कौतिक जाधव व भाऊ डॉक्टर (M.D. मुंबई) श्री. देविदास ओंकार जाधव यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पाट्या, पेन्सिल, खोडरबर, पट्टी, शार्पनर आदी शैक्षणिक साहित्य तसेच अल्पोपहार वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र पाटील सर यांनी केले, नियोजन श्रीमती वैशाली पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शत्रुघ्न रोकडे सर यांनी मानले. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश ढोले सर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सर्व सदस्य, गावकरी व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 106400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 97900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 80900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1270/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
