अमळनेरचा नूरअली SRPF मध्ये दाखल – गरिबीवर मात करत जिद्दीचा विजय..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :- गरीबी, प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्ष यांच्या जाळ्यात अडकलेल्या कुटुंबातून बाहेर पडत, अमळनेरचा जिद्दी तरुण सैय्यद नूरअली कचरोदिन याने स्टेट रिजर्व पोलीस फोर्स (SRPF) मध्ये भरती होऊन अभिमानास्पद यश संपादन केले आहे.
नूरअलीचा जन्म शहरातील मिल चाल भागात झाला. लहान वयातच वडिलांचे निधन झाले. तीन भावांमध्ये मोठा भाऊ नईम घरचा आधार ठरला. कंपाउंडरची नोकरी करत त्याने घराची जबाबदारी सांभाळली आणि धाकट्या भावाचे शिक्षण खंडित होऊ दिले नाही.
नूरअलीने प्राथमिक शिक्षण प्रताप हायस्कूलमध्ये तर उच्च शिक्षण प्रताप महाविद्यालयातून बी.ए.पर्यंत पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच तो रसवंतीगृहात किंवा इतर छोट्या-मोठ्या कामांद्वारे घरखर्चाला हातभार लावत असे.
सन २०२० मध्ये नूरअली होमगार्ड म्हणून रुजू झाला. पुढे MSF मुंबई मध्ये भरती होऊन अधिक मेहनत घेतली. अखेर त्याची निवड SRPF मध्ये झाली. सातत्यपूर्ण जिद्द आणि मेहनतीमुळे त्याचे स्वप्न साकार झाले.
नूरअलीचे यश समजताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. मोठ्या भावालाही प्रचंड अभिमान वाटला. कष्टातून उभा राहिलेला हा तरुण आता संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गरीब मुस्लिम समाजातून अधिकारी पदावर पोहोचणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नूरअलीचे यश तरुणाईला नवी ऊर्जा देणारे आहे.
आपल्या यशाचे श्रेय आई, मोठा भाऊ, गुरुजन आणि मित्रांना देत नूरअली म्हणतो – “ध्येय डोळ्यांसमोर ठेवा, परिश्रमाला शस्त्र बनवा; यश नक्कीच मिळते. माझे यश देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शहीद जवानांना समर्पित आहे.”
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 104000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 79000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1215/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
