देशमुख नगर परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ – स्त्री, पुरुष व लहान मुलांना चावे.

0
New-Doc-08-27-2025-23.17.jpg


आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर येथील देशमुख नगर, पिंपळे रोड परिसरात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. दिवसा–ढवळ्या रस्त्यावरून जाणाऱ्या स्त्री-पुरुषांपासून लहान मुलांनाही या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अमळनेर नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला असून, लहान मुलांचे जीवन धोक्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, नागरिकांचा प्रश्न आहे की – नगरपरिषद प्रशासन कधी लक्ष देणार? तसेच, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून जोर धरत आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 102800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 94500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 78100/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed