चिमणपुरी पिंपळे स्मशानभूमीत शंभर वृक्षांचे रोपण..

0
New-Doc-08-26-2025-21.47.jpg


आबिद शेख/अमळनेर
चिमणपुरी पिंपळे येथील स्मशानभूमीत पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबवित शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले. नीम, वड, पिंपळ आदी विविध प्रकारची झाडे या ठिकाणी लावण्यात आली.

या उपक्रमात कामगार आयुक्त मुंबई विजय चौधरी यांनी झाडांच्या संगोपनासाठी लोखंडी जाड्या दिल्या. तर हृदयविकारतज्ञ डॉ. बी. ओ. पाटील यांनी वड व पिंपळाची सहा ते सात फुट उंच झाडे उपलब्ध करून दिली. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांच्या सहकार्याने स्मशानभूमी व रस्त्याच्या दोन्ही बाजूस खड्डे खोदून वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी पुरुषोत्तम लोटन चौधरी, गोकुळ पाटील, संतोष चौधरी, गणेश लक्ष्मण पाटील, आबा पाटील, सतीश तुला पाटील, लोटन भिल, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, देविदास पाटील, नामू भिल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षारोपणानंतर झाडांच्या संगोपनाची जबाबदारी काही ग्रामस्थांनी स्वतःवर घेतली असून, यामुळे परिसर हिरवागार ठेवण्यास मदत होणार आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 102500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 94300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed