अमळनेर नगरपरिषद निवडणूक प्रभाग रचनेवर नागरिकांचा तीव्र विरोध.

0
New-Doc-08-26-2025-07.01.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून तीव्र हरकत नोंदवण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील काही भागांना नियमबाह्य पद्धतीने प्रभाग क्रमांक १२ मध्ये जोडण्यात आल्याचा आरोप करत शेख सलीम शेख फत्तु (रा. कसाली मोहल्ला, अमळनेर) यांनी मुख्याधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी हरकत अर्ज दिला आहे.
नागरिकांनी मांडलेल्या प्रमुख हरकती :
१) वाडी संस्थान परिसर, गुरव गल्ली, कुंभार टेक, किल्ला उतरती, मोती टेक, कोळी पुल, चौधरी वाडा, कासार गल्ली, माळी मडीजवळील भाग हा बोरी नदीच्या पलीकडे असतानाही प्रभाग १२ मध्ये जोडण्यात आला आहे. हा भाग नैसर्गिकरित्या व नागरिकांच्या वर्दळीच्या दृष्टीने प्रभाग १३ ला जोडला जाणे योग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
२) नव्या रचनेत सीमारेषांच्या नियमांचे उल्लंघन झालेले स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
३) अल्पसंख्यांक समाजाच्या मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद केले आहे.
४) नवीन विकास आराखड्यानुसार (डी. पी.) झालेल्या रस्त्याला ओलांडून काही भाग प्रभाग १२ मध्ये सामावून घेतल्यामुळे ही रचना नियमबाह्य असल्याचे सांगितले आहे.
या सर्व मुद्द्यांचा विचार करता, ही रचना राजकीय दबावाखाली झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, नागरिकांच्या हितासाठी सदर भाग प्रभाग क्रमांक १३ मध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे या वेळी शेखा मिस्त्री, सलीम टोपी, साबीर पठाण,गुलामनबी, अफरोज मुजावर, रफिक मिस्त्री,आरिफ पठाण,इम्रान,खाटीक, फिरोज मिस्त्री, मुशीर शेख,सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed