प्रा. अनंत देवगिरीकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’

0
New-Doc-07-27-2025-14.44.jpg

24 प्राईम न्यूज 27 Jul 2025

वारजे, – सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, वारजे (पुणे) येथील प्रा. अनंत मारुती देवगिरीकर यांना ‘भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ ने गौरविण्यात आले आहे. ए. डी. फाउंडेशन, पुणे या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा सन्मान प्रा. देवगिरीकर यांच्या अध्यापन क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला.

प्रा. देवगिरीकर यांनी अल्पवयातच अध्यापन क्षेत्रात लौकिक मिळवला आहे. अध्यापनातील निष्ठा, नवोपक्रमशीलता आणि समाजभान या गुणांमुळे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारशीलता, आत्मविश्वास आणि मूल्यसंस्कार रुजविण्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिकच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक विकास घडतो, अशी शिक्षण वर्तुळातून प्रशंसा होत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडला. पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सौ. वैशाली चव्हाण यांच्या हस्ते प्रा. देवगिरीकर यांना शाल, सुवर्णपदक, मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम मांडुरके, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज, तनिष्का फाउंडेशनचे अनिल जाहीर, ए. डी. फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महादेव महानोर, अध्यक्ष अशोक गोरड, तसेच खानदेशी अभिनेत्री ममता भोई आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. देवगिरीकर यांची पत्नी दिपीका देवगिरीकर ह्याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

या सन्मानाबद्दल महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. देवगिरीकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, हा पुरस्कार नवोदित शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो, असे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed